Breaking News

शेतमजुर युनियन लालबावटा कडुन निषेध

बुलडाणा, दि. 29 - रोजगार हमीची कामे उपलब्ध करून देण्यात यावी व केलेल्या कामाचा थकीत मोबदला, 15 दिवसात काम उपलब्ध न करून दिल्यास बेरोजगार भत्ता मिळावा म्हणुन सिंदखेडराजा राजा तालुक्यातील मजुरांनी दिनांक 15 मे 2016 रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो महिलांनी, मजुरांनी ठिय्या आंदोलन केले. सदर आंदोलनांच्या मागण्याचे निवेदन उपजिल्हाधिकारी श्री.नरेंद्र टापरे यांना देण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळासह काही मजुर चर्चेसाठी गेले असता त्यांच्या मागण्यांवर चर्चा न  करता उलट ह्या मजुरांना अपमानास्पद वागणुक देवुन रोजगार हमीच्या कामाबाबत प्रचंड उदासिनता दाखविली. त्याबद्दल शेतमजुर युनियन लालबावटा च्या वतीने त्यांच्या तिव्र निषेध करण्यात आला.
एकीकडे प्रचंड दुष्काळाणे जनता होरपळत असतांना त्यांच्या हाताला कामे नाहीत याबाबत मा.जिल्हाधिकारी साहेब, व संबंधित यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, यांच्याकडे कामाच्या संदर्भात अनेक वेळा तक्रारी केल्या असता वेळोवेळी टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली. सिंदखेडराजा तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी रोजगार हमीची कामे झालेली आहेत त्या मजुरांना कामाचा मोबदला देण्यात आला नाही. त्याठिकाणी मोठ्या प्रमानात भ्रष्टाचार झाल्याचे दिसुन येते. परंतु प्रशासकीय यंत्रना याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत आहे. सामाजिक वनिकरणाच्या कामाच्या मजुरांमध्ये मोठ्या प्रमानात घोळ झालेला आहे. अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणात मजुरकामगारांच्या मागण्यांकडे लक्ष न देता उलट त्यांना अपमानास्पद वागणुक दिली जात आहे. यावरून हे सरकार कोणाच्या बाजुने आहे हे दिसुन येते. या यंत्रणेतील भ्रष्ट मुजोर व दोषी अधिकारी कर्मचारी, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, इत्यादिंवर कठोर कारवाई करून मजुरांना ताबडतोब काम उपलब्ध करून देण्यात यावे तसेच थकीत कामाचा मोबदला व्याजासह व काम न दिल्यास बेरोजगार भत्ता देण्यात यावा अन्यथा 30 मे नंतर जिल्हाभर या विरोधात शेतमजुर युनियनच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष कॉ.उत्तमराव जाधव, शेख खालोद, जिल्हा सचिव, कांताताई सोनुने कार्याध्यक्ष, हिम्मत तिपाले, जाकीर पठाण, आनंदाबाई धोंगडे, पंचफुला म्हसे, रूख्मीना म्हस्के, लता साळवे, रेणुका सुतार, रेखा सुतार, इत्यादींनी दिला आहे. या मोर्चाला सी.आय.टी.यु. चे सेक्रेटरी कॉ.पंजाबराव गायकवाड, कॉ.राजन चौधरी, कॉ.विनायक देशमुख यांनी संबोधित केले.