शहराच्या नावलौकिकात सदाशिव अमरापूरकर यांचा मोलाचा वाटा
अहमदनगर, दि. 29 - या शहराच्या नावलौकिकात अनेक सत्पुरुषांचा वाटा आहे त्यापैकीच एक अमरापूरकर असून त्यांच्या शहराविषयीच्या आत्मीयतेचा विचार आजच्या प्रसंगी असला पाहिजे. हा नावलौकिक टिकवण्यासाठी आपण नागरिक काय करणार आहोत याचा विचार केला पाहिजे अशा भावना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी नीलफलक अनावरण प्रसंगी व्यक्त केली.
अ.नगरच्या 526 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रसिक ग्रुप अहमदनगर यांच्या वतीने नगर गौरव स्मृती अंतर्गत नगर सुपुत्र हिंदी, मराठी नाट्य, चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते स्व.सदाशिवजी अमरापूरकर यांच्या निवासस्थानी आज एका हृद्य समारंभात निलफलकाचे अनावरण जिल्हाधिकारी कवडे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी आ.संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, उपायुक्त अजय चारठाणकर, उद्योजक प्रदीप गांधी, नगरसेवक सुवेन्द्र गांधी, रसिक ग्रुपचे जयंत येलूलकर उपस्थित होते
यावेळी कवडे म्हणाले की जीवनात चांगले तेवढेच घ्यावे, एैतिहासिक वास्तू जोपासून शहराचा अभिमान बाळगावा, सार्वजनिक मालमत्तेची जपवणू कीचा संकल्प करून खर्या अर्थाने आजचा दिवस साजरा करून, हीच आमरापुरकर यांना आदरांजली आर्पित करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच अमरापूरकर यांचा मित्र परिवार- मकरंद खेर, मधुसूदन मुळे, अॅड.अशोक कोठारी, सदाशिव अमरापूरकर यांचे बंधू राजाभाऊ अमरापूरकर व कन्या रीमा अमरापूरकर गद्रे यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरवातीस रसिक ग्रुपचे संकेत होशिंग यांनी सर्वांचे स्वागत केले. तर आपल्या प्रास्ताविकातून रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी नीलफलक अनावरण संकल्पना स्पष्ट केली.
आ.जगताप यांनी अमरापूरकर ट्रस्टच्या उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले व रसिक ग्रुपच्या उपक्रमाचे कौतुक केले.