Breaking News

निवडणुकीत मराठ्यांना आरक्षणाचे स्वप्न दाखवले

। मराठा समाज संघटीत आणि आक्रमक झाल्याशिवाय आरक्षण नाही । युती सरकारकडुन महामानवांची बदनामी ः आ. राणेंची टिका 

अहमदनगर, दि. 29 - मराठा समाजाचा निवडणुकीपुरता उपयोग करुन युती सरकारने निवडणुकीत मराठा आरक्षणाचे स्वप्न दाखवले, मात्र अद्यापही ते पुर्ण करु शकले नाहीत. मराठा आणि मुस्लिमांना आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता दिसत नाही. वेळोवेळी विचारणा करुनही यावर सत्ताधारी काहीच बोलण्यास तयार नाही. तसेच युती सरकारकडून महामानवांचा कायम अपमानच केला जातो. अरक्ष
णाच्या मुद्यावर ज्या- ज्या समाजाने आक्रमक भुमीका घेतली, उग्र आंदोलने केली त्यांची दखल सरकारने घेतली आहे. त्या समाजाला तातडीने आरक्षण दिले आहे. तर मराठयांनी फक्त निवेदने द्यावी अशी अपेक्षा सरकारची आहे का ? मराठा  समाज संघटीत आणि आक्रमक झाल्याशिवाय आरक्षण मिळणार नसल्याचे प्रतिपादन मराठा एल्गान मेळाव्या प्रसंगी नीतेश राणे यांनी केले.
मराठा आरक्षण एल्गान मेळाव्यानिमित्त ते आज नगर येथील माऊली संकुल सभागृहात बोलत होते. यावेळी प्रथम दिपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी आ.संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, संपत बारस्कर, राजेंद्र निंबाळकर ,शांताराम कुंजीर, कुमार वाकळे पाटील, संजीव भोर, राजेश परकाळे, संतोष गव्हाणे, सचिन सातपुते, माजी नगरसेवक निखील वारे, सोमनाथ कराळे, अवधुत पवार, प्रविन कानवडे, अ‍ॅड.गजेंद्र दांगट, सांगर निंबाळकर,  सुनिल कदम, सागर फडके, संभाजी ढोले, डॉ.रामदास बर्डे, सिताराम बोरुडे, अ‍ॅड. शिवाजी कराळे, गणेश गायकवाड, मनोज कोंडके, गजेंद्र कवडे, शरद पवार, केरुभाऊ आठरे, अमोल भगत, प्रशांत नेटके पाटील, संजय मोरे, राजेंद्र सावंत, संदीप दंडवते, तांबे सर, अतुल लहारे, संतोष कदम, कृषीराज टकले, दत्तात्रय साठे, गिरीष भांबरे, प्रकाश कराळे, सागर नाईकवाडी, किशोर मरकड, संतोष पवार आदिसह मराठा समाजातील अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना राणे म्हणाले की, राज्यसरकार मराठा आरक्षण देण्याची फक्त घोषणा करत आहे. मराठ्यांना अरक्षण देणार केंव्हा हे ठामपणे सांगत नाहीत. त्यामुळे मराठा समाजाला सहजा सहजी आरक्षण मिळेल असे वाटत नाही. विधीमंडळाच्या अधिवेशनात आरक्षणाच्या मुद्यावर प्रश्‍न केल्यावर यांचे आश्‍वासन म्हणजे फक्त आरक्षण देणार आहे. देणार आहे, देणार आहे, असे सांगत असताना यांना आरक्षण देण्यासाठी काय मुहर्त पहायचा आहे का असा सवाल त्यांनी यावेळी केला.
ज्या पुरंदरेंनी राजमाता जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केली या पुरंदरेला युती सरकारने महाराष्ट्र भुषण दिला या सरकारकडुन आपण काय अपेक्षा करायच्या. शिवरांयाची तसेच आमच्या महामानवांची बदनामी करणार्‍यांच्या हाती आपण आपल्या शिवरायांचा भगवा द्यायचा का ? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
मराठ्यांनो व्याख्यान म्हणुन मेळाव्याकडे पाहू नका, आज प्रवासाची सुरवात झाली आहे, आगे बढो म्हणण्या पेक्षा एकत्र चला, मराठा एकत्र होत नाही याचा फायदा अनेकांनी घेतला आहे. पाटीदार समाज एकत्र येतो तर मराठा समाज काय एकत्र येवु शकत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
उभे राहिलो तरी आरक्षण मिळेल ः आ.जगताप
मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आहे, मात्र मराठा समाज एकत्र येत नसल्याने सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे, अनेकदा या प्रश्‍नावर चर्चा केल्यास उत्तर फक्त देणार आहे येते. परंतु मराठा समाज हा नुसता रस्त्यावर उतरला आणि उभा राहिला तरी मराठा समाजाला आरक्षण मिळेल मात्र, मराठा समाज एकत्रित उभा राहत नाही अशी खंत आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
सर्व मराठा संघटनांनी एकत्र यावे ः महापौर कळमकर
मराठा समाजाला आरक्षण मिळवायचे आहे, भावि पिढीला अरक्षणाची गरज आहे. परंतु जोपर्यंत आम्ही सर्वजन एकत्र येत नाही तोपर्यंत आरक्षण मिळणे अवघड आहे. यासाठी सर्व मराठा संघटनांनी आणि कार्यकर्त्यानी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही असा मार्मीक टोलाही महापौर अभिषेक कळमकर यांनी लगावला.
मेळाव्यात उस्फुर्त प्रतिसाद ः अनेकांचा सन्मान 
मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यास मोठी गर्दी झाली होती. या मेळाव्यात मराठा आरक्षणासाठी योगदान असलेल्या शांताराम कुंजीर, गोरख दळवी, अ‍ॅड.गजेंद्र दांगट यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुंजीर यांनी सांगीतले की, महामानवांचा अपमान करणार्‍या सरकारकडुन आपण काय अपेक्षा करायच्या यासाठी सर्वांनी मिळुन काम केले पाहिजे.