अन् वीस मिनिटात सव्वालाख रुपये जमले
। सुनीलच्या उपचारासाठी आ. राहुल जगताप यांचा पुढाकार । सर्वतोपरी मदत करणार ः आ.जगताप
श्रीगोंदा, दि. 29 - औटेवाड़ी येथील सुनील बन्शी शेळके वय- पंधरा याच्या हृदयाची एक बाजू निकामी झाली आहे. त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे समजताच आ. राहुल जगताप यांनी शेळके कुटुंबियांची भेट घेत आर्थिक मदत करत समवेत असलेल्या सहकार्याना मदतीचे आवाहन केले . अवघ्या वीस मिनिटांत एक लाख पंचवीस हजार रुपयांची मदत जमा झाली. सुनील च्या उपचारासाठी आणखी एक लाख पंचाहत्तर हजार रुपयांची गरज आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा शहरातील औटेवाड़ी येथील सुनील बन्शी शेळके हा पंधरा वर्षांचा मुलगा नववी इयत्तेत शिकतो आहे. दोन वर्षापुर्वी त्याला श्वासोश्वासाचा त्रास होऊ लागला. त्याच्या पालकांनी आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने त्याला शिर्डी येथील रुग्णालयात दाखल केले . मात्र तिथे काहीच निदान झाले नाही. त्याच्या मुंबई येथील खाजगी रुग्णालयात काही तपासन्या केल्यानंतर त्याच्या हृदयाची एक बाजू निकामी झाली असल्याचे डॉक्टरानी सांगितले. त्याच्या उपचारासाठी जवळपास वीस लाख रूपये इतका खर्च असुन , मुख्यमंत्री सहायता निधी, इतर देवस्थानचा निधी वगळता रुग्णालय प्रशासनाने नातेवाइकाना तीन लाख रूपये भरन्यास सांगितले.घरची परिस्थिती जेमतेम असल्याने एवढी मोठी रक्कम कशी उभा करायची ? या विवंचनेत असतानाच बन्शी शेळके यांनी ही अडचण नगरसेवक दादासाहेब औटी यांना सांगितली.
औटी यांनी आ. राहुल जगताप यांच्यासमोर सुनील शेळके याच्या जीवनाची चित्तर कथा मांडली. आ. जगताप यांनी आज ( अठाविस) सुनील शेळके याच्या घरी जावून त्याची भेट घेतली. त्याला धीर देत तुझ्यावर नक्की उपचार होतील. या आजारातून तु नक्की बरा होशील असे सांगत रोख पंचवीस हजार रुपयांची मदत केली. सुनील याच्यावर उपचार होणे आवश्यक आहे. प्रत्येकाची मदत त्याच्या उपचारासाठी कामी येणार आहे असे आ. जगताप यांनी आवाहन करताच नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अख्तर शेख, दादासाहेब औटी, भरत नाहटा, मछिन्द्र सुपेकर, राजू गोरे, आसिफभाई इनामदार, गोरख खेतमाळीस, फक्कड़ मोटे, गोरख सप्रे, संतोष शेळके, तुकाराम औटी, नीलेश दामगुड़े, धनंजय औटी, नानासाहेब पिपळे, बापूराव सिदनकर, दशरथ हिरडे, तुळशीराम औटी, प्रदीप औटी , काळे मामा, रामभाऊ औटी, पांडुरंग औटी, अड़. सुनील भोस यांनी मदतीचा हात पुढे केला.