Breaking News

नेवासा शहर भाजपच्या अध्यक्षपदी पोपटराव जीरे यांची नियुक्ती

नेवासा, दि. 29 - नेवासा येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते व भटक्या विमुक्त समाजाचे नेते पोपटराव जीरे यांची भाजपच्या नेवासा शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रामजी शिंदे,आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या शिफारशीनुसार जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड,यांच्या सुचनेप्रमाणे भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर माऊली पेचे यांनी श्री पोपटराव जीरे यांची भाजपच्या नेवासा शहराध्यक्षपदी निवड केली आली.
श्री पोपटराव जीरे यांनी या अगोदर भाजपच्या विविध उपक्रमात सहभाग नोंदविला असुन सत्तेत नसतांना आंदोलनात्मक लढा उभारून पक्ष वाढीसाठी मोठे योगदान दिले आहे.नेवासा शहर हे तालुक्याचे मुख्य केंद्र असल्याने भाजपच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान राबवून नेवासा शहराला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना पोपटराव जीरे यांनी सांगितले.तसेच पक्ष श्रेष्ठींनी भटक्या समाजाला संधी दिल्याने भाजपमध्ये बहुजन समाजाच्या प्रत्येक घटकांना बरोबर घेउन पक्ष मजबूत करु असे ही जीरे यांनी स्पष्ट केले.भाजपच्या शहराध्यक्षपदी पोपटराव जीरे यांच्या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.