Breaking News

महिलांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात राष्ट्रवादीचे निवेदन

। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या  वतीने आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी

अहमदनगर, दि. 29 -  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महापालिकेचे  नूतन  आयुक्त  दिलीप  गावडे यांची शहर  जिल्हाध्यक्षा रेश्मा चव्हाण - आठरे  यांनी  भेट  घेऊन सत्कार केला. यावेळी रंजना उकिर्डे, रेखा जरे, शहेनाज बागवान, साधना बोरुडे, अपर्णा पालवे, अनुराधा कांबळे, बानू शेख, तसेच स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले उपस्थित होते.
यावेळी आयुक्त दिलीप गावडे यांच्याबरोबर आठरे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. सौ. आठरे म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध  योजना राबविण्यात येतात. या योजना अधिक प्रभावीपणे राबवून विशेषतः महिलांसाठी असलेल्या योजनांची महिलांना माहिती व्हावी, या उद्देशाने मनपाने शिबिराचे आयोजन करावे. या शिबिराच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन योजनांची माहिती द्यावी.
सदर योजना महिलांपर्यत पोहचल्यास या शिबिराचा चांगला परिणाम दिसून येईल तसेच  यातून महिलांंची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल.
मनपाच्या वतीने येत्या पावसाळ्यात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून,  यामध्ये  सहभाग नोंदवण्यास आम्हाल आनंदच होईल, असे सांगितले.