Breaking News

वादळी पावसाने नुकसान झालेल्यांचे पंचनामे करा-आपदग्रस्ता़ंची मागणी

नेवासा, दि. 29 - नेवासा शहर व परिसरातील बर्‍याच   भागात गुरुवारी दि  मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.या मध्ये अनेकांचे लाखोंचे नुकसान झाले.मात्र या बाबत महसूल प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने याबाबत महसूलच्या यंत्रनेने त्वरित पंचनामे करून नुकसान झालेल्यांना मदत द्यावी अशी मागणी आपद्ग्रस्तांनी केली आहे.
गुरुवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने  कही ख़ुशी,कही गमयाचा अनुभव पहावयास मिळाला. पेक्षा भयंकर दुष्काळाची प्रचिती नागरीकांसह शेतकर्‍यांना आल्याने अचानक आलेल्या पावसाने बर्‍याच जणांना दिलासा मिळाला तर काही जणांवर मोठे संकट ओढवले गेले.यात काहींचे घरांचे पत्रे उडून गेले, तर काहींचा संसारच उघड्यावर पडले.
नेवासा शहराच्या दक्षिण दिशेस खुपटी रोडवरील सामाजिक कार्यकर्त्या  सौ.मंगल नगरे यांचे घरच वावटळात उध्वस् झाले.जनावरे कोंबडया नाहीसे झाले.भांडे-कुंडे व इतर संसारपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संसार उघड्यावर पडले.तसेच बर्‍याच ठिकाणी झाडे उन्मळून पडली.घरांच्या भिंती पडल्या.जनावरे गायब झाल्याच्या तक्रारी आपद्ग्रस्तांनी केल्या मात्र महसूल विभागाचे कोणीही पंचनामे करण्यासाठी आले नाही
आमदार बाळासाहेब मुरकुटे याबाबत प्रशासनाला काय सुचना देतात व आपद्ग्रस्तांना कोणता दिलासा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून मदत मिळेल तेव्हा मिळेल मात्र महसूल प्रशासनाने पंचनामे त्वरित करावे अशी मागणी आपद्ग्रस्त नागरीकांनी केली आहे.