Breaking News

डोनाल्ड ट्रम्प यांची उमेवारी जवळ-जवळ निश्‍चित?

वॉशिंग्टन, दि. 29 - आता अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार बनणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले असून  ट्रम्प उमेदवारीसाठी आवश्यक असणार्‍या 1237 प्रतिनिधींचे जादुई आकड्यांपर्यत पोहचल्यामुळे आता ते नोव्हेंबरमध्ये होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत  रिपब्लिकन पार्टीचे उमेदवारीचे एकमात्र दावेदार बनले आहेत.
ट्रम्प यांनी आता 1238 प्रतिनिधींचे समर्थन मिळवले आहे, जे नोव्हेंबरमध्ये होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारीसाठी 1237  प्रतिनिधींचे समर्थन मिळविण्याच्या संख्येपेक्षा एकने जास्त असल्याचे मत राज्यवार प्रतिनिधींची गैर सरकारी मोजणी करणार्‍या रियल क्लियर पॉलिटिक्स डॉट  कॉमने नोंदवले आहे. साधारणपणे वर्षभरापूर्वी राजकारणात प्रवेश केलेल्या 69 वर्षीय ट्रम्प हे व्हाइट हाउसच्या शर्यतील आता एकटेच आहेत. सुरुवातीला यासाठी  आणखी 17 उमेदवार मैदानात होते.