विकासाच्या मुद्यावरच उत्तर प्रदेश निवडणूक : राजनाथ सिंह
नवी दिल्ली, दि. 28 - भाजप 2017 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना राम मंदिराचा मुद्दा वापरणार नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. केवळ विकासाच्या मुद्यावरच उत्तर प्रदेशातील राज्य विधानसभेला सामोरे जाताना लक्ष्य केंद्रीत केले जाणार असल्याची माहिती राजनाथसिंह यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना दिली आहे.
केंद्रातील भाजपच्या सत्तास्थापनेला नुकतीच 2 वर्षे पूर्ण झाली असून उर्वरीत 3 वर्षांत करावयाच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. पुढच्या वर्षी हो घातलेली उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक ही 2019 सालच्या लोकसभा नि
वडणुकीची नांदी ठरणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्वच पक्षांनी या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केलेली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपकडून आता राम मंदिराचा मुद्दा प्रचारात वापरला जाईल, असा कयास लावला जात आहे. राम मंदिराची उभारणी हा सर्वस्वी सांस्कृतिक विषय असून हा काही राजकीय मुद्दा असू शकत नाही. हा विषय सध्या न्यायालयीन कक्षेत विचाराधिन असून त्याबाबत अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही.
केवळ आणि केवळ राज्याचा विकास या एकमेव विषयावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. मतांसाठी धार्मिक, जातीय तुष्टीकरण करण्याचे प्रयत्न आजवर भारतीय जनता पक्षाने केलेले नाहीत आणि या पुढेही असे होणार नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होणा-या काही घोषणांकडे लक्ष्य वेधले असताना राजनाथसिंह यांनी, अशा घोषणा देणा-या कार्यकत्र्यांना सक्त ताकीद देणार असल्याचे सांगत, द्वेष पसरविणा-यांची गय करणार नसल्याचे स्पष्ट केले. उत्तर प्रदेशात पक्षाकडे अनेक चेहरे उपलब्ध असल्याचे सांगताना राजनाथसिंह यांनी मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक नसल्याचेच संकेत दिले. राज्यात पक्षाच्या प्रचाराची धुरा आपण समर्थपणे सांभाळू, जनसभा संबोधित करू मात्र मुख्यमंत्रिपदात आपल्याला अजिबात रस नाही, असेही राजनाथसिंह यांनी नमूद केले आहे.