पार पडली हायस्पीड ‘टॅल्गो’ रेल्वेची चाचणी
बरेली, दि. 28 - बरेलीत टॅल्गो या हायस्पीड रेल्वेची चाचणी पार पडली. ताशी 200 किमी वेगाने स्पेनने बनवलेली ही टॅल्गो रेल्वे धावू शकते. बरेली ते मुरादाबाद या स्थानकादरम्यान धावणार असून त्याची चाचणी नुकतीच घेण्यात आली.
ही हायस्पीड टॅल्गो रेल्वे गाडी बरेली ते मुरादाबाद या स्थानकादरम्यान धावणार असून त्यासाठी शुक्रवारी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी बरेली ते भोजीपुरा दरम्यान घेण्यात आली. यावेळी टॅल्गो ही अतिशय जलद असून प्रवासास सुकर असल्याची प्रतिक्रिया चाचणीप्रसंगी टॅल्गोत बसण्याची संधी मिळालेल्या प्रवाशांनी दिली. टॅल्गो रेल्वे ही स्पेनच्या बनावटीची असून ती 29 मेपासून सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
टॅल्गोचे डबे गेल्या महिन्यात मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर ते बरेली येथील कोच फॅक्टरीत पाठविण्यात आले. टॅल्ग्रो ट्रेन ही 9 डब्यांची असणार आहे. या गाडीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्गाची गरज नाही. मात्र, त्या पूर्वी डब्यांच्या रचनेत व चाकांत बदल करावा लागणार आहे. हे आवश्यक बदल करण्यात आले. आता ही गाडी भारतात धावण्यासाठी सज्ज आहे. सर्व चाचण्या यशस्वी झाल्यास मुंबई-दिल्ली प्रवास 8 तासांमध्येच पूर्ण होऊ शकतो. सध्या भारतात सर्वाधिक वेगाने धावणारी रेल्वे नवी दिल्ली ते आगरा या मार्गावर ताशी 160 किमी वेगाने धावते. टॅल्गोचा वेग वेगवेगळ्या मार्गांवर वेगवेगळा राहणार आहे.