आघाडी-युतीत रस्सीखेच ः बेरजेचे राजकारण सुरु
अहमदनगर, दि. 30 - महापौर निवडणुक म्हंटल की, मोठा घेडेबाजार असे अनेकदा समोर आहे आहे, आता उन्हाळा संपला असला तरी पुन्हा एकदा सहलीचे वातावरण तयार झाले आहे. सहल कशासासाठी तर सहल बाहेर गेल्यावर कोणालाही तडजोडीचे राजकारण करता येत नाही. यातुनच आता आघाडी आणि युतीची नगरसेवक फोडाफोडीत रस्सीखेच सुरु झाली आहे. केडगावातील माजी नगरसेविकोचा सेनेत प्रवेश म्हणजे एक प्रकारे महापौरपदाच्या उमदेवार सुवर्णा संदीप कोतकर यांना शह असल्याचे मानले जात आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हनूनच आजपर्यंत केडगाव विभागाकडे पाहिले गेले आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँगे्रसच्या गटातील अस्वस्थता पाहता शिवेसनेेने आपली रणनिती आखली असुन शहरातील जे इतर पक्षातील नाराज आहे त्यांना आपल्या गटात आणण्यासाठी गनीमी काव्याने प्रयत्न सुुरु आहे.
राष्ट्रवादीचे महापौर संग्राम जगताप हे आमदार झाल्यानंतर त्यांनी आपल्या महापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर याच जागेवर माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतने अभिषेक कळमकर हे महापौर झाले. त्यावेळी सेनेने अनेक प्रकारच्या रणनिती आखल्या होत्या, मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही, परंतु यंदा त्यांनी आपल्या पक्षातच नाजरांना ओढण्याचा सपाटा लावला आहे. यामध्ये मनसेचेे नगरसेवकही असल्याचे सांगीतले जाते.
आपलर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष यातील ज्यांना ज्यांना महत्त्वाच्या वेळी डावलले गेले अशा अनेकांच्या संपर्कात शिवसेना असल्याचे सांगितले जाते. याचाच एक नमुना म्हणजे महानगरपालिकेत सत्ताधारी आणि सध्याच्या बालकल्याणच्या सभापती यांच्या पुत्राचा लाच लुचपत प्रतिबंधक प्रकरणी एकाला लाच घेताना पकडुन दिल्याचा प्रकार आहे. यातुन हीच मनपातील महापौरपदाच्या निवडणुकीची बिगूल समजले जात आहे.
यामधुन आता असे स्पष्ट दिसते आहे की महापौरनिवडणुकीत अनेक जन गैरहजर राहूनच आपली साथ शिवसेनेला देतील.