Breaking News

नकोच 125 व्या जयंतीचे अवडंबर; दलित बहुजन नेत्यांनीही यावे भानावर

किशोर पाटीलच्या मुजोरीला वेसण घालण्याची हिम्मत दाखवा

मुंबई, विशेष/प्रतिनिधी, दि. 31 - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती महोत्सवाचे अवडंबर करून महाराष्ट्र शासन दीनदलित बहुजन  समाजाची दिशाभूल करीत आहे तर दुसरीकडे महामानवाच्या नावावर राजकारण करून स्वतःला आंबेडकर चळवळीचे पाईक म्हणविणारे दलित बहुजन नेतेही  बाबासाहेबांच्या नावाचा निव्वळ बाजार मांडीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया सध्या साबांत उमटू लागली आहे.
होय! महाराष्ट्र सरकार वरून पुरोगामी बहुजन कल्याणाचे किर्तन करीत असले तरी आतून मात्र जातीयवादाचा तमाशा करीत आहे तर या जातीयवादी सरकारच्या  दावणीला बांधलेले आणि स्वार्थापोटी विरोधाचे अस्त्र म्यान करणारे बहुजन नेतेही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणार्‍या कार्यकारी अभियंता  किशोर पाटील यांस प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठीशी घालीत असल्याचा आरोप का होऊ लागला? याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या जयंतीचे हे 125 वे वर्ष. नेमक्या वेळी जातीयवादी म्हणून हेटाळणी होत असलेले सरकार राज्यात सत्तेवर आले. आपल्यावर असलेला जातीयवादाचा शिक्का  पुसण्याची योग्य संधी म्हणून या सरकारने महामानवाच्या 125 व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधले आणि राज्यभर नव्हे देशभर दीनदलित दुबळ्यांसाठी विविध  योजनांचे ढोल बडविण्यास सुरूवात केली. या योजनांच्या नादावर दलीत बहुजन नेतेही मनसोक्त नाचण्याची हौस पुर्ण करून घेतांना दिसत आहेत. प्रत्यक्षात हे  सरकार आणि त्यांच्या नादावर नाचणारे बहुजन दलीत नेत्यांचे महामानवाविषयी दिसत असलेले प्रेम बेगडी तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली  आहे. अर्थात या शंकेला पुष्टी मिळावी अशाच घटना घडत असल्याने स्वाभाविकपणे ही शंका खरी वाटू लागली आहे.
मुंबई रस्ते विकास संकल्पचित्र विभागाच्या कार्यालयात किशोर पाटील नामक एका कार्यकारी अभियंत्यांकडून राजरोसपणे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह  सर्वच महापुरूषांचा होत असलेला अवमान ही घटना अशाच घटनांपैकी एक. किशोर पाटील नामक या कार्यकारी अभियंत्यांने आपल्या कार्यालयातील डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रासह सर्वच महापुरूषांची तैलचित्र काढून अडगळीत फेकून दिले. वास्तविक ही अतिशय गंभीर बाब आहे याची जाहीर वाच्यता  झाल्यानंतर त्याची दखल ना 125 व्या जयंतीचे अवडंबर माजविणार्‍या सरकारने घेतली. डॉ. आंबेडकर यांच्याविषयी असलेली आस्था या नेत्यांनी सत्तेच्या  शहाणपणा समोर लिलाव केली का? कुठे गेला बहुजन दलीत स्वाभीमान? असा सवाल खुलेआम विचारला जात आहे. वास्तविक सर्वच प्रशासकीय  कार्यालयांपासून मंत्रालयापर्यंत दलीत बहुजनांच्या विविध संघटना आहेत. या संघटनांच्या नेत्यांनाही हा मुद्दा  धसास लावण्याचे शहाणपण सुचले नाही. याविषयी  आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
विशेष ः फुलब्री उपविभागात सर्व्हेची कामे मजूर संस्थाच्या नावे तुकडे पाडून (स्पिलटप) करण्यात आले. मा. मुख्यमंत्री व सेवानिवृत्त अतिरिक्त साबां. सचिव  श्री.आनंद कुलकर्णी यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाऊलं उचलून एक वेगळा पायंडा पाडण्याचे दृष्टीने मोठ्या कामाचे व एकाच कामाचे तुकडे (स्पिलटप) करू नये  असा आदेश काढला होता. परंतु फुलब्री उपविभागात सर्वेच्या कामाचे तुकडे पाडण्यात आले. औरंगाबाद मंडळ अंतर्गत तात्कालिन कार्यकारी अभियंता श्री.पी.के.  पाटील यांनी कामाचे (स्पिलटप) केल्यामुळे औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. खंडपीठाने राज्य शासनाला श्री.पी.के पाटील यांचेवर  कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. परंतु राज्य शासनाने (माजी मंत्री इडीग्रस्त) भुजबळांनी भ्रष्टाचाराला साथ दिल्याने श्री.पी.के. पाटील यांचेवर आज तगायत  कार्यवाही करण्यात आलेली नाही. हे सरकारची नामुष्की नाही तर काय सा.बां. सचिवांनी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
विधानसभा सभापतींनाही लावला चुना
साबांतील भुजबळ प्रवृत्तीची पिलावळ किती गेंड्याच्या कातडीची आहे. किंबहुना त्यांची कातडी गेंड्यापेक्षाही टणक असल्याचा अनुभव दस्तुरखुद्द  विधानसभा सभापती हरिभाई बागडे यांच्या मतदार संघातही येत आहे. औरंगाबाद साबां प्रादेशिक विभागातील कार्यसंहिता आणि प्रशासकीय नियम धाब्यावर  बसवून कोट्यवधींची हेराफेरी सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिक्षक अभियंता ए.बी.सुर्यवंशी (फुलंब्री) यांच्या इशार्‍यावर कार्यकारी अभियंता वृषाली गाडेकर  यांनी प्लॅन-नॉन प्लॅनची तब्बल 90 कोटीची (लेखाशिर्ष 5054/03 - 5054/04, नाबार्ड व रस्त्याची डागडुजी म्हणजे खड्डे भरणे) देयके मार्च अखेरपर्यंत अदा  केली, तर पश्‍चिम विभागात शेंडे यांनी याच प्रकारातील 50 कोटींची बिले अदा करून साबांला शेंडी लावली आहे. यासंदर्भात भाजप, संघ परिवारातील काही  जाणकारांसह सामाजिक कार्यकर्ते परमेश्‍वर नलावडे यांची सविस्तर मुलाखत उद्याच्या अंकात-
किशोर पाटीलचा पोबारा 
किशोर  पाटील कार्यकारी अभियंता, मुबंई रस्ते विकास संकल्पचित्र विभागाच्या कार्यालयातील महापुरूषांची चित्रे अडगळीत टाकल्याची, बातमी प्रसिध्द  होताच, व ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे यांनी याप्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, व बहूजन नेत्यांनी तोंडाला काळे फासण्याचा  इशारा दिल्यांनतर किशोर पाटील यांनी कार्यालयाला कुलुप लावून पोबारा केला आहे.