Breaking News

बिकीनी एअरलाईन्स घेणार 100 बोईंग घेणार

व्हिएतनामबीजिंग, दि. 29 - जगाची आर्थिकस्थिती तशी नाजूकच असून फार काही नफ्यात एअरलाईन्स चालत नाहीत. अशी परिस्थिती असताना व्हिएतनाम  येथील ‘व्हिएतजेट’ या खासगी विमान कंपनीने 100 बोईंग घेण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यवहारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या नुकत्याच  झालेल्या व्हिएतनाम भेटीत सह्या करण्यात झाल्या आहेत. ही कंपनी 2011 मध्ये सुरू झाली आहे. पण गंमत म्हणजे या कंपनीच्या विमानात एअर होस्टेस  बिकीनी आणि शॉर्टस परिधान करून असतात. कंपनीचे ही कल्पता ब-याच वेळा टीकेची धनी ठरली आहे. पण या कंपनीच्या अफलातून कल्पकतेमुळे कंपनी  अल्पावधीतच फायद्यात आली आहे.
या एअर होस्टेस विमानात ‘बिकीनी शो ही सादर करतात. तसेच या कंपनीच्या विमान प्रवासाचे दर
सर्वसामान्यांना परवडणारे असे ठेवण्यात आले आहेत. बसने  प्रवास करण्यापेक्षा थोडे जादा पैसे गेले तरी धमाल प्रवास अनुवता येत असल्याने व्हिएतनाममधील अनेक प्रवासी या एअरलाइन्सला पसंती देतात. ज्यांनी कधी  विमान प्रवास केला नाही, असेही लोक आकर्षक तिकिट दरांमुळे या एअरलाइन्सकडे वळत आहेत. सध्या व्हिएतनाममध्ये एकूण चाळीस टक्के मार्केट शेअर या  कंपनीचा आहे. ब-याच जणांना ही एअरलाईन्स ‘बिकीनी एअरलाईन्स’ म्हणूनच परिचित आहे. या कंपनीच्या अध्यक्षा महिला असून त्यांचे नाव नग्युयेन थी फुआँग  असे आहे. व्हिएतनामधील त्या पहिल्या महिला अब्जाधीश आहेत.