Breaking News

ब्राह्मणांच्या पालखीचे वाहक होवू नका !

भारतीय समाजव्यवस्था वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या संघर्षात राहीलेली दिसत असली तरी हा संघर्ष ब्राह्मण विरूध्द बहुजान असाच राहीला आहे. सातव्या  शतकानंतर मात्र ही व्यवस्था जातीव्यवस्थेने ग्रस्त झाली. सुरुवातीला ही व्यवस्था व्यवसाय निहाय बनविल्याचे सांगितले जात असले तरी तो नुसता बनाव होता. कारण  या व्यवस्थेत क्रमिक असमानता लागू करून श्रमिकांचे विभाजन करणारी ही व्यवस्था राहीली. ब्राह्मण समुदायाने जातीव्यवस्था निर्माण केली या म्हणण्यात फारसे तत्थ्य  नसले तरी ही व्यवस्था टिकवण्यात मात्र ब्राह्मणी समुदायाने महत्वाची भूमिका बजावली यात बरेच तत्थ्य आहे. ब्राह्मण आणि बहुजन यांची संस्कृती, राष्ट्र हे सारेच वेगळे  आहे. आपल्या देशात साधारणत: इतिहास संशोधकांनी हे स्पष्ट केले आहे की, आर्य हे बाहेरून आले असून हिंदू बहुजन हे भारतीय आहेत. त्यामुळे ज्यांचे राष्ट्र जुळत  नाही त्यांची संस्कृतीही जुळत नाही. कारण संस्कृती ही जाती किंवा धर्मनिहाय राहत नाही, तर ती नेहमी एखाद्या देशाची वा राष्ट्राची असते. त्यामुळेच आपण भारतीय  समाजव्यवस्थेकडे पाहीले तर धर्मबदल असूनही आमची संस्कृती सारखी दिसते. यासाठी आपण उदाहरण पाहीले तर कोणत्याही धर्मात लग्न समारंभ असेल तर हळद  लावणे हा प्रकार सर्वांमध्ये दिसतो. याचाच अर्थ हळद लावणे ही प्रथा भारतीय संस्कृती आहे. हळद ही शेतीप्रधान देशातील पीक आहे. भारतीय समाज मुळत: शेतीशी  निगडीत आहे. ज्यांना आपण क्षेत्रीय म्हणतो त्याची व्याख्या भारतातील प्राचीन भाषेत समाविष्ट होणार्‍या पाली भाषेच्या साहीत्यात दिसतो. पालीत बुध्दाने खत्तिय म्हणजे  क्षेत्र करणारे अशी व्याख्या केली आहे. क्षेत्र म्हणजे शेती. या शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. त्यामुळेच शेतीला क्षेत्र म्हटले गेले. क्षेत्र चा दुसरा अर्थ स्त्री असा होतो.  याच्यावरून आपण हे देखील जाणतो की भारतीय समाजव्यवस्था ही शेतीप्रधान असेल तर स्त्री प्रधान नक्कीच होती. हिंदू बहुजन समाजात अनेक प्रथा अशा आहेत की  ज्यावरून आपणास हे कळू शकते की हा समाज इतिहासात स्त्रीसत्ताक होता. आजही आपण ग्रामीण भागात निरीक्षण केले तर असे दिसते की मुला-मुलींची लग्न  जुळवायची असतील तर मुलीचा पिता मुलाच्या घरी जात नाही, तर मुलाच्या आईवडिलांनाच मुलीच्या घरी सोयरीक घेवून जावे लागते. ही प्रथा स्त्रीचा सन्मान करणारी  आहे.
त्याचप्रमाणे हिंदू बहुजन समाजात मामाच्या मुलीशी सोयरीक करता येते. म्हणजे आत्या म्हणून स्त्रीचाच मान जपला गेला आहे. याऊलट उच्चजातीयांमध्ये खासकरून  राजपूत व ब्राह्मण या जातीमंध्ये मुलीचे आई-वडिल मुलाकडे स्थळ घेवून जातात. म्हणजे त्यांच्या स्त्री सत्ताकतेची कोणतीही प्रतिके त्यांच्या सांस्कृतिक व्यवहारात  दिसत नाही. यावरूनही ब्राह्मण धर्मीय हे हिंदू नाहीत किंवा आमच्या देशाच्या संस्कृतीशी त्यांची संस्कृृती जुळत नाही किंवा एक नाही हे स्पष्ट होते. यासर्व प्रकारातून हे  तेवढेच स्पष्ट आहे की ब्राह्मण समुदाय  आणि आम्ही म्हणजे हिंदू बहुजन यांच्यात नुसता संस्कृतीचाच फरक नाही तर देशाचाही फरक आहे. म्हणून ते मुलभूत वैशिष्टे  म्हणून येथील हिंदू बहुजनांचे विभाजन करण्यात धन्यता मानतात. तोडा-फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नव्हे तर ब्राह्मणांची संस्कृती आहे. आज हिंदू बहुजनांना हे  सारे समजून घेणे कठीण असले तरी आवश्यक आहे. कारण आमचा इतिहास ज्ञात असल्याशिवाय आम्हाला या देशाच्या मुख्य प्रवाहातील सत्ता साधनांवर आमचा हक्क  सांगता येणार नाही. ब्राह्मण आणि हिंदू बहुजन यांच्यातील केवळ सांस्कृतिक फरक अधोरेखीत करणे एवढेच या मालिकेचे उद्दीष्ट नाही. तर सातव्या शतकापूर्वीपर्यंत या  देशातील श्रीमंत आणि सावकार असणारा हिंदू बहुजन समाज जातीत विखरून टाकून ब्राह्मणांनी स्वत:ची सत्ता धार्मिक सत्तेच्या पलिकडे जावून म्हणजे सर्व प्रकारच्या  सत्ता हातात घेतल्या आहेत. ही सत्ता अबाधित ठेवणयासाठी हिंंदू बहुजनांना ते सत्तेची वरवरचे तुकडे चाखण्यासाठी फेकत आहेत. निर्णयाची सत्ता नसलेले हिंदू बहुजन  हे ब्राह्मणांच्या पालखीचे भोईच ठरतील.