Breaking News

रिओ ऑलिंपिकसाठी सलमान सदिच्छादुत

नवी दिल्ली, दि. 25 -  भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) रिओ ऑलिंपिकसाठी सदिच्छा दूत म्हणून अभिनेता सलमान खान याची निवड केली असून
, त्याचे नाव समारंभपूर्वक जाहीर करण्यात आले. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्याऐवजी सलमानला पसंती देण्यात आली.
या दोन अभिनेत्यांच्या तुलनेत तरुणांशी जास्त जवळचे नाते आणि क्रीडाप्रेमी अशी प्रतिमा यामुळे सलमानच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. सलमान 50 वर्षांचा असून, देशभरात बॉडीबिल्डिंग करणार्‍यांसाठीही तो प्रेरणास्थान आहे. सुलतान या आगामी चित्रपटात त्याने कुस्तीपटूची भूमिका केली आहे. लहान गावातून आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविणार्‍या स्पर्धकाची कथा यात आहे.आयओए मुख्यालयात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात महिला बॉक्सर एम. सी. मेरी कोम, हॉकी कर्णधार सरदार सिंग, रितू राणी, नेमबाज अपूर्वी चंडेला, तिरंदाज दीपिका कुमारी, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा असे नामवंत क्रीडापटू उपस्थित होते.