रेल्वे धरणातून ठाणे आणि नवी मुंबईकरांना पाणी
मुंबई, दि. 24 - लातूरची पाणी समस्या मिटविल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ठाणे आणि नवी मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी पाऊल उचलले आहे. सुरेश प्रभू यांनी ठाणे आणि नवी मुंबईतील पाणीसमस्या सोडवण्यासाठी रेल्वेसाठी वापरण्यात येणार्या धरणांमधून पाणी सोडण्याचा आदेश शनिवारी दिल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. नवी मुंबईला ठाण्यातील रेल्वे धरण पाणीपुरवठा करुन त्यांना मदत करत आहे. त्याचप्रमाणे आता आम्ही ठाणे महापालिकेला पाणीपुरवठा करुन मदत करणार असल्याचे ट्विट सुरेश प्रभू यांनी केले आहे. या धरणांमधील पाणी रेल्वेच्या गरजांसाठी वापरण्यात येते. आता हे पाणी ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांना पुरवण्यात येईल असे सुरेश प्रभू यांनी सांगितले आहे.