Breaking News

डाळींच्या भावांत पुन्हा तेजी; नियंत्रण आवश्यक

पुणे, दि. 17 - डाळींच्या भावांत पुन्हा तेजी निर्माण झाली असून तूर, हरभरा आणि उडीद डाळींच्या भावांत वाढ होत आहे. या डाळींचा नवीन हंगाम सुरू होण्यास सहा महिन्यांचा कालावधी असून, वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर पुन्हा भाववाढीचा प्रश्‍न स
मोर येईल. 
पुण्यातील घाऊक बाजारात डाळींची प्रतिदिन 20 ते 30 टन आवक होत आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यांत डाळींचे भाव स्थिर होते; परंतु गेल्या पंधरा दिवसांत एकदम तूर, हरभरा, उडीद आणि मसूर डाळींचे भाव वधारले. ही वाढ होण्यामागे सट्टेबाज असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सरकारने डाळींचे भाव नियंत्रणात राहण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापार्‍यांनीच केली आहे. गेल्या वर्षी दिवाळीत डाळींचे भाव वधारल्यानंतर राज्य सरकारने व्यापार्‍यांवरच कारवाई केली; पण साठेबाज आणि सट्टेबाजांकडे दुर्लक्ष केले. या वेळी घाऊक बाजारात तूरडाळीचा भाव 180 ते 190 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचला होता. कारवाईनंतर डाळीच्या बाजारात सावध खरेदी सुरू झाली होती. नवीन हंगाम डिसेंबर-जानेवारीमध्ये सुरू झाल्यानंतर हे भाव प्रतिकिलो 125 रुपयांपर्यंत खाली आले होते. पुन्हा वधारू लागले आहे.