Breaking News

जि.प.अध्यक्षांकडून खातेनिहाय आढावा

बुलडाणा (प्रतिनिधी), 04 -  जिल्हा परिषद विविध योजना राबवित असून, धडक सिंचनासाठी 77 कोटी अनुदान प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे यांनी दिली. तसेच त्यांनी सर्व खात्यांचा आढावा घेतला.
जिल्हा परिषदमार्फत शासनाच्या विविध योजना राबविल्या जातात. सदर योजनांची स्थिती काय आहे, याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष अलकाताई खंडारे यांनी बुधवारी विविध खात्यांकडून आढावा घेतला. यामध्ये समाजकल्याण विभागाकडे 3 कोटी 15 लाख 52 हजार रुपये निधी असून, पैकी 2 कोटी 22 लाख रुपयांचे ताडपत्री, इलेक्ट्रिक मोटार, पी.व्ही.सी. पाइप आदी साहित्याचे पुरवठा आदेश देण्यात आलेत तसेच कृषी विभागाकडे 1 कोटी 30 लाखांचा निधी असून, ताडपत्री, इलेक्ट्रिक मोटार, पी.व्ही.सी. पाइप पुरवठयचे आदेश देण्यात आलेत. पशुसवंर्धन विभागाकडे दुधाळ जनावरे शेळीगटासाठी 50 लाख रुपयांची तरतूद असून, शेषमधून कोल कॅबिनेट 50 लाख व संगणाक खरेदी 42 लाख रुपयांचे पुरवठा आदेश दिलेत. 
आरोग्य विभागानेसुद्धा 93 लाख रुपयांचे साहित्य खरेदीचे पुरवठा आदेश दिल्याचे सांगण्यात आले. टंचाईसाठी अनुदान प्राप्त नसून, धडक सिंचनासाठी 77 कोटी अनुदान प्राप्त असल्याचे सांगण्यात आले. यासह विविध खात्यांचा आढावासुद्धा यावेळी घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, समाज कल्याण सभापती गणेश बस्सी, अर्थ व बांधकाम सभापती अंकुश वाघ, कृषी विकास अधिकारी रमेश भराड, पशुसंवर्धन अधिकारी सुनील पसरटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी एस.एस. इगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुजारी व व्ही.व्ही.यादव, समाजकल्याण अधिकारी मनोजकुमार मेरत, कार्यकारी अभियंता (बांधकाम) एन.एस. शेगोकार, हर्षवर्धन डोंगरदिवे, देशमुख, कोष्टी यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.