वन कामगार कृती समितीचे धरणे
बुलडाणा (प्रतिनिधी), 04 - वनखाते, सामाजिक वनीकरण आणि वनविकास महामंडळमधील पाच वर्ष रोहयो फंडातून वेतन घेणार्या बारमाही रोजंदारी वन कामगारांना शासन सेवेत कायम करण्याच्या मागणीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दि. 3 मार्च 2016 रोजी वनकामगारांची धरणे दिले. हे धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य रोेजंदारी वन कामगार कृषी समितीचे राज्य संघटक कॉ मधुकर अंभोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
महाराष्ट्र सरकारणे 1989 ते 1994 मध्ये योजना, योजनेत्तर पाच वर्ष काम केलेल्या 13 हजार वन सामाजिक वनीकरण कामगारांना शासन सेवेत कायम केले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने 16 मे 2012 रोजी वनखाते, सामाजीक वनीकरण आणि वनविकास महामंडळामधील योजना, योजनेत्तर पाच काम केलेल्या 6546 वन कामगारांना शासन सेवेत कायम करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. परंतु 1982 पासून ते आजपर्यंत एनआरईपी, आरएलईजीपी, एआरवाय, जीआरवाय, डीपीईपी व रोहया फंडातून बारमाही वेतन घेणार्या कामगारांना सदर निर्णयातुन वगळण्यात आले. 1982 पासुन आजपर्यंत वरील योजनेमधील बारमाही काम करणारा कामगार शासन सेवेत कायम झाला नाही. आणि योजना, योजनेत्तर 97 ते 98 मध्ये लागलेला
कामगार कायम झाला. सिनीअर कामगार कायम झाला नाही आणि ज्युनिअर कामगार कायम झाले. योजना,योजनेत्तर मध्ये जे कामगार काम करतात तेच काम वरील योजनेचे कामगार सुध्दा करतात. पर्यावरण समतोल राखण्यासाठी हे दोन्ही योजनेचे कामगार काम करतात. परंतु योजना,योजनेत्तर योजनेमध्ये जो कामगार काम करतो तो शासन सेवेत कायम होतो. आणि रोहयोच्या फंडातुन 30 ते 35 वर्षे काम केलेला कामगार कायम होत नाही. करिता कृपया शासन निर्णय दि. 16 ऑक्टोंबर 2012 व 31 ऑक्टोंबर 2013 च्या शासन निर्णयाप्रमाने वन कामगारांना शासन सेवेत कायम करण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच सामाजिक वनीकरण परिक्षेत्र लोणारमध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामे सुरू आहेत. सदर कामावर दररोज 100 मजुर काम करतात. परंतु दि.12 डिसेंंबर 2015 ते 21 डिसेंबर 2015 दिवस 10 (2)29 डिसेंबर 2015 ते 6 जानेवारी 2016 दिवस 9 (3) 14 जानेवारी 2016 ते 24 डिसेंबर 2016 दिवस 11 एकूण सर्व दिवस 30 या वरील कालावधीमध्ये कामगारांनी काम करून आतापर्यंत पगार मिळाला नाही. कामगार हे मा.लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र लोणार यांच्या कार्यालयात पगार मागण्यासाठी गेले असता आम्ही वरील कालावधीची तहसिलला ई मस्टरची मागणी केली असता ई मस्टर आम्हाला मिळाले नाही. त्यामुळे तुमचा पगार होनार नाही. मेहरबान साहेब व 100 मजुरांनी 30 दिवस काम केले त्यांचा पगार नाही. त्यांनी केलेल्या कामाचा पगार देण्यात यावा. या अगोदर संघटनेने मा.तहसिलदार साहेब लोणार यांना जा.क्रं.7,2016 दि.25 जानेवारी 2016 ला कृषी समितीने लेखी पत्र दिले आहे.
सामाजिक वनीकरण परिक्षेत्र जळगाव जामोद मध्ये मा.लागवड अधिकारी यांनी महादेव खानोदे, दिनकर तिजारे व गुलाब भगत यांना रोजगार हमीच्या कामावरून जाणून बुजून बंद केले आहे.
वरील कामगार हे गेल्या 20 ते 25 वर्षापासुन परिक्षेत्रामध्ये विविध योजनाध्ये काम करीत होते. वरील कामगारांना काम देण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या धरणे आंदोलनात कॉ मधुकर अंभोरे, कृषी समितीचे जिल्हा सरचिटीनीस सुखदेव शिंदे, मनोहर पिंगळे, रामेश्वर खारडे, रामचंद्र कठोरे, विष्णु भालेराव, मारोती पनाड, दिलीप वेलकर, विश्वनाथ आसाबे, श्रीकृष्ण सवळतकर, परमेश्वर कदम, जिवण वानखेडे, वामन पारवे, नारायण इंगळे, अशोक हिवराळे, रामेश्वर बावणे, प्रकाश गोवर्धने, भानदास मस्के व बहुसंख्य कामगार उपस्थित होते.