Breaking News

भारत माता की जय म्हणण्यास नकार दिला म्हणून तीन युवकांना मारहाण


नवी दिल्ली : भारत माता की जय म्हणण्यास नकार देणार्‍या मदरशातील तीन तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी दिल्लीमध्ये घडली आहे.मदरशाजवळील पार्कमध्ये फिरण्यास गेलो असताना त्याठिकाणी जमाव आला आणि त्यांनी या तिघांना भारत माता की जय असे म्हणण्याची बळजबरी केली. या तिघांना भारत माता की जय म्हणण्यास नकार दिल्याने त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एकाचा हात तुटला असून, तिघांवरही स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या प्रकरणाची पोलिसांकडून दखल घेण्यात आली असून, आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. 26 मार्चला ही घटना घडली
आहे. पोलिस तपास करत आहेत. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भारत माता की जय म्हणण्यास नकार दिल्यानंतर ही घोषणा चर्चेत आली आहे.