जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत दोन शेतकर्यांची आत्महत्या
बीड, 04 - जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत दोन शेतकर्यांनी आत्महत्या करून जीवन संपविले. नापिकीला कंटाळून धावज्याचीवाडी (ता. बीड) येथील मोहन धोंडिराम काटे (वय 35) यांनी बुधवारी विष घेतले होते. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
नापिकी, आर्थिक विवंचनेतून वाघाळा (ता. अंबाजोगाई) येथील शेतकरी रघुनाथ नागोराव जगताप (55) यांनी आज गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे जिल्हा बँकेच्या एका शाखेत दोन लाख 79 हजार रुपये अडकलेले आहेत. गरजेच्या वेळी पैसे मिळत नसल्याने ते हतबल होते, असे सांगण्यात आले.