मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा
औरंगाबाद, 04 - मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागांत येत्या चोवीस तासांत वादळी वार्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून, अनेक ठिकाणी गारपिटीचीही शक्यता असल्याचा इशारा कुलाबा (मुंबई) येथील विभागीय कार्यालयातर्फे आज दिला. याशिवाय येत्या 48 तासांत उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातही गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.