लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा यांचे निधन
नवी दिल्ली, दि. 4 - लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे निधन झाले आहे. ते 68 वर्षांचे होते. दिल्लीतील राहत्या घऱी ह्रद्यविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे.
पी ए संगमा 11 व्या लोकसभेचे अध्यक्ष होते. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभेत पी ए संगमा यांच्या निधनाची माहिती दिली. लोकसभेत पी ए संगमा यांना आदरांजली वाहिण्यात आली. आदरांजली वाहिल्यानंतर लोकसभेचे कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. लोकसभेचे कामकाज हसतमुखाने कसे कराव हे मी पी. ए. संगमा यांच्याकडून शिकल्याची भावना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे.