मुलीचे लैंगिक शोषण ; पिता- मुलीला जबर मारहाण
सातारा, 05 - मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या कथित आरोपावरून गोपाळ समाजातील जातपंचायतीने संशयित आरोपी पिता व पीडित मुलीला चक्क चाबकाने फटके मारण्याची अमानुष शिक्षा केली. वाई तालुक्यातील पाचवड गावातील जातपंचायतीत घडलेला हा प्रकार नुकताच एका व्हिडिओ फुटेजमुळे समोर आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी जात पंचायतीच्या पंचांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी पाच जणांना अटकही करण्यात आली आहे. तर पीडित मुलीच्या वडिलांवरही लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आठवड्यापूर्वी ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अज्ञात व्यक्तीने याबाबतचे व्हिडिओ फूटेज पुरवल्यानंतर ही अन्यायकारक घटना चव्हाट्यावर आली. सातारा येथील एका स्वयंसेवी सामाजिक संस्थेने पाचवड येथील गोपाळ समाजाच्या जात पंचायतीने केलेल्या या अघोरी कृत्याची ध्वनी चित्रफित भुईंज पोलिसांना सादर केली. त्यावरून पोलिसांनी संबंधित जातपंचायतीतील आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. गोपाळ समाजातील जातपंचातीचे पंच जिया दिनकर पवार, राजाराम, पवार, शिवाजी पवार, दत्तू चव्हाण, सर्जेराव चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी पीडित मुलगी व संशयित आरोपी असलेल्या तिच्या वडिलांना काठीने फटके मारण्याची शिक्षा व तीन हजार रुपये दंड ठोठावला होता.
या आदेशानुसार जात पंचायतीच्या सदस्यांसमोर संबंधित पिता- मुलीला जबर मारहाणही करण्यात आली.
दरम्यान, पाच पंच व मुलीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना समुपदेशनासाठी पाठवण्यात आले आहे. भुईंज पोलिस ठाण्याचे अधिक
ारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ.हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर व इतर सामाजिक संस्थांनी
या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सरकारने अशा स्वयंघोषित पंचांविरोधात कारवाईसाठी कठोर कायदा लवकरात लवकर लागू करावा, अशी
मागणीही दाभोलकर यांनी केली आहे.