भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हांचे कन्हैयाला समर्थन
नवी दिल्ली, 05 - जेएनयू विदयार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमाराच्या सुटकेनंतर अनेक मोठ्या नेत्यांनी त्याला आपले समर्थन दिले आहे. मात्र, आता भाजपमध्येही काही जण कन्हैयाला समर्थन देत आहेत. भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी कन्हैयाला आपले समर्थने दिले असून त्याला मिळालेल्या जामीनावर आपण खुश असल्याचेही ते म्हणाले.
आजवर शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षाबाबतची आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. बिहार निवडणुकीपासून पक्षाच्या विरोधात अनेकदा बोलताना ते दिसले. भाजपमधील नेतृत्वावरही त्यांनी अनेकदा टीकास्त्र सोडले. आता तर शत्रुघ्न यांनी कन्हैयाला समर्थन देत पक्षावरच निशाणा साधला आहे. शत्रुघ्न यांनी ट्वीट केले. कन्हैयाला मिळालेल्या जामीनाबाबत आनंद आहे.