Breaking News

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई, 04 - ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे. शाल, सुवर्ण कमळ आणि 10 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी 2014 मध्ये ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 
पत्थर के सनम, हरीयाली और रास्ता, वो कौन थी, हिमालय की गोद में, उपकार, नील कमल, पूरब और पश्‍चिम आणि क्रांती या चित्रपटात त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. अनेक देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे त्यांची भारतकुमार म्हणूनही ओळख आहे. 60 आणि 70 च्या दशकात मनोज कुमार यांच्या सिनेमांना फारच यश मिळाले. 78 वर्षीय 1957 पासून 1995 पर्यंत चित्रपटात सक्रीय होते. मनोज कुमार यांनी अभिनयाबरोबर दिग्दर्शनही केले. तसेच त्यांनी अनेक देशभक्तीपर चित्रपटांची निर्मितीही केली आहे. 1992 साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.
मनोज कुमार यांचे खरे नाव हरीकिशन गिरी गोस्वामी होते. मात्र चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी नाव बदलून मनोज कुमार केले. मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 फाळणीपूर्वी पाकिस्तानच्या एबटाबादमध्ये झाला होता.