अभिनेत्री उर्मिला मातोंडकर अडकली लग्नाच्या बंधनात
नवी दिल्ली, 04 - बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लग्नाच्या बंधनात अडकली आहे. उर्मिलाने गुरूवारी आपल्यापेक्षा 9 वर्षांनी लहान असलेल्या काश्मिरी बिझनेसमन आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीर यांच्याशी लग्न केले आहे. लग्न खूप साधेपणाने झाले. लग्नाबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. यात दोन्ही कुटुंबातील काही ठराविक जण आणि काही मित्र उपस्थित होते.