सोन्याच्या आमिषाने लुटणार्या दोघांना अटक
अहमदनगर । प्रतिनिधी । 04 - स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लुटणार्या टोळीतील दोघांना बुधवारी दुपारी भिंगार कॅम्प पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. पाठलाग सुरू असताना तिघा संशयितांनी पलायन केले. अर्जुन सोमनाथ सोनवणे (रा. यशवंतनगर, सोनई) व महेश बाळासाहेब झावरे (ढवळपुरी, ता. पारनेर) असे ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नावे आहेत. शहरातील औसरकर मळा येथून आरोपींना ताब्यात घेतले.
आठ दिवसांपूर्वी कल्याण येथील दिनेश रघुनाथ पंडित यांना स्वस्तात सोने देण्याचे सांगत विसापूर फाटा येथे बोलावून घेतले. सुरवातीला पंडित यांना दहा हजारात सात ग्रॅम सोने दिले. त्यानंतर दोन किलो सोने पाच लाखात देतो, असे सांगून वाकोडी परिसरात बोलावले. यावेळी सुमारे आठ ते दहा जणांनी पंडित यांच्यासह दोघांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील पाच लाख रुपये रोख रक्कम हिसकावून पोबारा केला. या घटनेत जबर मार लागल्याने फिर्यादीसह दोघांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी दुपारी त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत सहायक पोलीस निरीक्षक अहिरे यांना सर्व हकीकत सांगितली. तसेच मारहाण सुरु असतानाच्या वेळी मोबाईलमध्ये घेतलेले चित्रीकरण पोलिसांना दाखवले.
चित्रीकरण पाहताच यातील काही जणांची ओळख पटवत माहिती घेत कॅम्प स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी भाऊसाहेब काळे, जावेद शेख, गोरख शेरकर, दत्तात्रय पोटे हे आरोपीच्या शोधात त्याच्या घरी गेले तिथे आरोपी मिळाला नाही.