गोपाळ समाजाची जात पंचायत बरखास्त
अहमदनगर । प्रतिनिधी । 04 - गोपाळ समाजाची जात पंचायत कायमची बरखास्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य गोपाळ समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. समाजाचे राज्य सचिव पंडित लोणारे, कार्याध्यक्ष रघुनाथ जाधव यांनी मंगळवारी औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत जात पंचायत बरखास्त केल्याची घोषणा केली आहे.
गोपाळ समाजाचे कार्यकर्ते संभाजी पवार, संजय गिर्हे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रवींद्र सातपुते यांनी समाजाच्या राज्य कार्यकारिणीकडे जात पंचायत बरखास्त करण्याची मागणी केली होती. या मागणीचा कार्यकारिणीने अत्यंत गंभीरपणे विचार केला. बरखास्तीच्या मागणीला कार्यकारिणीने सकारात्मक प्रतिसाद देत मंगळवारी औरंगाबादला खुली चर्चा घेतली. त्यामध्ये जात पंचायत बरखास्त करण्यावर एकमत झाले. समाजाचे उपाध्यक्ष प्रा. प्रकाश सावंत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रवींद्र सातपुते, अनिल सुद्रिक आदी यावेळी उपस्थित होते. जात पंचायत बरखास्त करुन समाजाने क्रांतीकारक बदल स्वीकारल्याचे लोणारी म्हणाले.