Breaking News

राज्याच्या अर्थसंकल्पात धरणांसाठी भरीव तरतूद

 अहमदनगर । प्रतिनिधी । 04 - राज्याच्या अर्थसंकल्पात नगर जिल्ह्यातील कुकडी, निळवंडे, ताजनापूर आणि विसापूर धरणासाठी भरीव तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दिले. 
जलसंपदामंत्री महाजन यांनी जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री राम शिंदे, गोदावरी खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक पी. ए. बिराजदार, कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक के.एम. शहा, मुख्य अभियंता एच. एम. शिंदे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, आ. शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, राहुल जगताप, भाऊसाहेब कांबळे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील 22 प्रलंबित प्रकल्पांचा विषय बैठकीसमोर होता. प्रत्येक प्रकल्पाची माहिती यावेळी घेण्यात आली. जिल्ह्यातील कुकडी प्रकल्प व वितरिका, निळवंडे धरण व वितरिका, अमृतलिंग, भुतवडा, वांबोरी चारी, लाख धरण, ताजनापूर प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्याच्या अगामी अर्थसंकल्पात अधिकाधिक निधीची तरतूद करण्यात येईल, असे ते म्हणाले.