मराठा असल्यामुळे मला टार्गेट केले जाते : तावडे
उस्मानाबाद, 05 - राज्याच्या मंत्रिमंडळात चांगली कामे केली. मात्र आपण मराठा असल्यामुळे मला टार्गेट केले जाते आहे, असा धक्कादायक आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केला आहे.
तावडे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौर्यावर असताना त्यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी दुधाची बाटली फेकली. या प्रकारानंतर तावडेंचे पीए संतोष सुर्वे यांनी शेतकर्यांना बेदम मारहाण केली. त्याबाबत विचारणा केली असताना असताना विनोद तावडेंनी हा आरोप केला. विनोद तावडेंच्या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे आहे? याची उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.