Breaking News

इशरत जहाँचे एन्काउंटर नव्हे, हत्या होती : सतीश वर्मा

नवी दिल्ली, 03 - इशरतचे एन्काउंटर ‘बनावट’ दाखवण्यासाठी ‘यूपीए’ सरकारच्या काळात मानसिक व शारीरिक छळ झाल्याचा आरोप गृहमंत्रालयाचे निवृत्त उपसचिव आरव्हीएस मणी यांनी केला आहे. त्यापाठोपाठ मणी यांच्या विशेष चौकशी पथकाचे अधिकारी सतीश वर्मा यांनी या प्रकरणी पहिल्यांदा गौप्यस्फोट केला आहे. इशरत जहाँचे एन्काउंटर नव्हे, तर तिची हत्या करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर हे हत्याकांड पूर्वनियोजित असल्याचे सतीश वर्मा यांनी म्हटले आहे. 
 एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये वर्मा यांनी इशरत जहाँ एन्काउंटरप्रकरणी नवा दावा केला आहे. वर्मा यांनी सांगितले, की इशरत व तिच्या साथीदारांचे हत्या करण्यापूर्वी इंटेलिजन्स ब्यूरोच्या (आयबी) अधिकार्यांनी एक दिवस आधीच ताब्यात घेतले होते. दहशतवाद्यांसोबत एक महिलाही आहे, याबाबत आयबीने आपल्या अहवालात उल्लेख दिली नाही.  इशरतबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. इशरतसह तिच्या साथिदारांना बेकायदा कोठडीत ठेवण्यात आले व दुसर्या दिवशी सगळ्यांची हत्या करण्यात आल्याचे वर्मा यांनी म्हटले आहे.