Breaking News

मर्सिडिज, मारुती सुझुकी, टाटाच्या कार महागल्या !

मुंबई, 03 - लोकसभेत 2016-17 साठी अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सने आपल्या कारच्या किंमतीत वाढ केली आहे. तसेच मर्सिडिज बेंजनेही 5 लाखापर्यंत किंमतीत वाढ केली आहे. 
मारुती सुझुकीने कारच्या किंमतीत 34,494 रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. तर टाटाच्या कार 35000 रुपयांपर्यंत महाग झाल्या आहेत. मारुती सुझुकीने स्मार्ट हायब्रिड मॉडेल्स व्यतिरिक्त सर्व मॉडेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. मारुती कारच्या किंमतीत 1,441 ते 34,494 रु. वाढ करण्यात आली आहे. मारुती अल्टो 800च्या किंमतीत 1,441 रु. वाढ करण्यात आली आहे. कंपनीने बजेटमध्ये ऑटोमोबाइल इंडस्ट्रीवर लावण्यात आलेल्या नव्या इंफ्रास्ट्रक्चर सेसनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने बजेटमध्ये कारवर 4 टक्क्यांपर्यंत इंफ्रा सेस लावला आहे. मारुती सुझुकीचे स्मार्ट हायब्रिड मॉडेल सियाज आणि एर्टिगाच्या किंमतीत वाढ करण्यात आलेली नाही. तसेच ह्युंदाई आणि होंडा कारच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.