पठाणकोट हल्याचे सर्व पुरावे पाकिस्तानकडे सुपूर्त ः किरेन रिजिजू
नवी दिल्ली/प्रतिनिधी । 01 - पठाणकोट दहशतवादी हल्याचे सर्व पुरावे पाकिस्तानच्या हवाली केली असल्याची माहिती गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत दिली आहे. पठाणकोट दहशतवाही हल्ला प्रकरणी प्रथमच भारताने पुरावे दिल्यानंतर पाकिस्तानने कारवाईच्या दिशेने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानने तपासासाठी पथक पाठण्याचा निर्णय घेतला आहे मात्र त्यांनी यासंबंधी सविस्तर माहिती दिलेली नाही. कोणत्या तारखेला येणार आहेत ? तसंच या पथकात किती लोक असतील ? ही माहिती अजून पाकिस्तानने दिली नसून आम्ही माहिती मिळण्याची वाट पाहत आहोत असं किरेन रिजिजू यांनी सांगितलं आहे.