आज धोनी ब्रिगेडची टक्कर ऑस्ट्रेलियाशी
मोहाली, 27 - भारतीय संघाची गाठ आज ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. मोहालीतल्या मैदानात हा सामना रंगणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघासाठी उपांत्य फेरीच्या दृष्टीकोनातून हा सामना महत्वाचा आहे. आतापर्यंत भारताला एकाही सामन्यात विरोधी संघावर निर्विवाद वर्चस्व गाजवता आलेले नाही. त्याचाच फटका भारताच्या धावगतीवरही दिसून येतो. ऑस्ट्रेलियाची धावगती ही सध्याच्या तुलनेत भारतापेक्षा सरस आहे. त्यामुळे कांगारुंना मोठ्या फरकाने हरवण्याचे ध्येय आज धोनी ब्रिगेडसमोर असणार आहे.