राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी
मुंबई, दि. 4 - मुंबईसह उपनगरे व राज्यातील विविध भागात शुक्रवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर नाशिकमध्ये काल रात्रीपासूनच दमदार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच मुंबईतील वातावरण ढगाळ होते, बोरिवली-कांदिवली परिसरात पावसाने हजेरी लाली. तर ठाणे तसेच वसई-विरार भागातही विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोससळल्या.
अंधेरी, विलेपार्ले, कांदिवली तसेच दादर परिसरातही ढगांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत असून चाकरमान्यांचे मात्र मोठे होत आहेत. पावसामुळे ब-याच ठिकाणी वाहतूक कोंडीही झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान काल रात्रीपासूनच नाशिक व जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वार्यासह पावसाला सुरुवात झाली. औरंगाबादमध्येही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.