Breaking News

उत्तराखंड राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

डेहराडून, 28 - उत्तराखंड राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे, तसेच राज्याच्या विधानसभेचे तात्पुरते निलंबन करण्यात आले आहे.  
शनिवारी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटने घेतलेल्या तातडीच्या बैठकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यातर्फे राष्ट्रपतींना करण्यात आली होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी सकाळी घटनेच्या कलम 356 अंतर्गत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यास संमती दिली आहे. रविवारी सकाळी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भारतीय जनता पक्ष उत्तराखंड राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देत असल्याचा आरोप केला होता. तसेच भाजप पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर राज्यातील सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले होते. गेले काही दिवस उत्तराखंड राज्यातील सरकार मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहे.