Breaking News

पाकिस्तानने केला ’कोहिनूर’ हि-यावर दावा

लाहोर, दि. 10 - ’कोहिनूर हिरा’  ’हि-यावर’ पाकिस्ताननेही  दावा केला आहे. याच ’ कोहिनीर हिर्‍या’साठी गेल्या कित्येक वर्षांपासून भारत सरकारकडूनदेखील प्रयत्न सुरू आहेत. 
 ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मुकुटातील ’कोहिनूर हिरा’ पाकिस्तानत परत आणण्यासाठी सरकारला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका लाहोर उच्च न्यायालयाने स्वीकारली असून आता 
बॅरिस्टर जावेद इक्बाल जाफरी यांनी याप्रकरणी याचिका दाखल करत दस्तुरखुद्द महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासह पाकिस्तानमधील ब्रिटिश उच्चायुक्तालयाला प्रतिवादी केले होते. 105 कॅरेट्सचा हा हिरा पाकिस्तानच्या निर्मितीपूर्वी अस्तित्वात असलेल्या प्रांताचा भाग होता, त्या न्यायाने त्याची मालकी आता पाकिस्तानकडेच असली पाहिजे, असा युक्तिवाद जाफरी यांनी केला होता. मात्र ब्रिटनच्या राणीविरोधातील प्रकरणाची सुनावणी घेणे न्यायालयाच्या कक्षेत येत नसल्याचे सांगत न्यायालयाच्या निबंधकांनी ही याचिका दाखल करून घेण्यास आक्षेप नोंदवला होता. पण लाहोर उच्चन्यायालयाचे न्या. खालीद महमूद खान ते आक्षेप फेटाळत ती याचिका दाखल करून घेण्याचे आदेश दिले.