मुंबई 26/11 हल्ला आजची सुनावणी तांत्रिक अडचणीमुळे तहकूब
मुंबई, 10 - 26:/11 हल्ल्यातला मुख्य गु्न्हेगार डेव्हिड हेडली याची आजची सुनावणी तहकूब झाली. हेडली अमेरिकन तुरुंगात शिक्षा भोगतोय. मुंबईमध्ये सुरू असलेल्या खटल्यात त्याची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी सुरू आहे. मात्र आज तांत्रिक अडचणीमुळे ही कॉन्फरन्स होऊ शकली नाही. सकाळी 7 वाजता सुनावणी सुरू होणे अपेक्षित होते. त्यानंतर ही वेळ पुढे ढकलण्यात आली. अखेर सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
उद्यासाठी दीड तासाचा अधिक वेळ अमेरिकन अधिकार्यांनी दिला. यामध्ये हल्ल्याबाबत आणखी तपशील मिळवण्याचा सरकारी बाजूचा प्रयत्न असेल. हेडलीने गेल्या दोन दिवसांत दिलेल्या साक्षीत हल्ल्यात पाकिस्तानचाच हात असल्याचे वारंवार सांगितले. पाकिस्तान लष्करापासून ते आयएसआयच्या अनेक अधिकार्यांना भेटल्याचे त्याने स्पष्ट केले.