Breaking News

केंद्रीय कर्मचार्‍यांचे बेसिक सॅलरीच्या दुप्पट होणार वेतन

नवी दिल्ली, 16 - केंद्रीय कर्मचार्‍यांना वेतनामध्ये बेसिक वेतन 30 टक्के पर्यंत वाढ शकते. नोव्हेंबर 2015मध्ये सातव्या वेतन आयोगाच्या नुसार (30 टक्के) 23.55 टक्के जादा आहे. केंद्रीय कर्मचारी संघटना या गोष्टीला विरोध करीत आहेत. सातवे वेतन आयोगच्या शिफारशीनुसार कर्मचार्‍यांचे वेतनात फक्त 14.27 टक्के लाभ होत आहे. गेल्या 70 वर्षांतील सर्वात कमी आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांनी या मुद्द्यावर 11 एप्रिलपासून संपावर जाण्याची धमकी दिली आहे. 
केंद्र सरकारला सातव्या वेतन आयोगाने आपला अहवाल दिला आहे. त्यानुसार केंद्रीय कर्मचार्‍यांना वेतन आणि भत्ते 23.55 टक्के वाढविण्याची शिफारस केले. तसेच सैनिक आणि निमसैनिकांना वन रँक वन पेन्शन देण्याची शिफारसही केले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना सादर करण्यात आलेल्या अहवालात सध्याच्या कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनात 16 टक्के, भत्त्यात 63 टक्के आणि निवृत्ती वेतनात 24 टक्के वाढ करण्याची शिफारस केली गेली आहे. न्यायमूर्ती ए. के. माथूर यांच्या आयोगाने सातवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचार्‍यांना कमीत कमी 18 हजार आणि अधिकाधिक 2.25 लाख रुपये वेतन देण्याची शिफारस केले. तसेच आयोगाने केंद्रीय कर्मचार्‍यांना वेतन वर्षाला 3 टक्के वाढ करण्याची शिफारस केले. सहावा वेतन आयोग 1 जानेवारी 2006पासून लागू झाला आहे.