Breaking News

’राहुल गांधीविरोधातही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

नवी दिल्ली, 16 - देशाविरोधात घोषणाबाजी करणार्‍या जेएनयूमधील आरोपींना समर्थन दिल्याने आणि सभा घेतल्याने अलाहाबाद जिल्हा न्यायालयात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. राहुल गांधींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी याचिकाकर्त्यांने केली आहे. 
कोर्टाने याप्रकरणी आज सुनावणी पूर्ण केली असून उद्या दुपारी दोन वाजता याचा निर्णय सुनविण्यात येणार आहे. हायकोर्टाचे वकील आणि भाजप नेते सुशील मिश्र यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत कलम 124, 124 अ, 500 आणि 511 अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. राहुल गांधींनी आरोपींना समर्थन देऊन देशद्रोहाचे काम केले असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.