Breaking News

ेकर्ज बुडवणार्‍या कॉर्पोरेट कंपन्यांची यादी सादर करा- सर्वोच्च न्यायालया

 नवी दिल्ली/प्रतिनिधी । 16 - सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्ज बुडवणार्‍या कॉर्पोरेट कंपन्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून,या बडया कॉर्पोरेट कंपन्यांची यादी जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दिले आहेत. 
सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 500 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचे कर्ज थकवणा-या कंपन्यांची तसेच ज्या कंपन्यांना कर्जाची पूर्नबांधणी करुन देण्यात आली आहे त्याची माहिती सादर करण्याचे सांगितले आहे.कोणत्याही मार्गदर्शक तत्वांच पालन न करता तसेच थकीत कर्जाची वसुली करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसताना इतक कर्ज कसे मंजूर करण्यात आलं त्याची सर्वोच्च न्यायालयाला माहिती हवी आहे. मुख्य न्यायमूर्ती जी.एस.ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आरबीआयला प्रतिज्ञापत्राव्दारे माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. कर्ज थकबाकीदारांची यादी बंद पाकिटातून देण्यास सांगितले आहे. बुडीत कर्जामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची तिमाहीत झालेली बिकट आर्थिक परिस्थिती पाहता सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.