Breaking News

शिबीरामुळे न्यायालयीन बंदींचे आरोग्य चांगले राहण्यास मदत : चोंधे

सातारा, 22 -  जिल्हा रुग्णालय व जिल्हा कारागृह प्रशासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीरामुळे न्यायालयीन बंदींचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल व समाधानी राहतील, असे प्रतिपादन जिल्हा कारागृहाचे अधीक्षक नारायण चोंधे यांनी केले.
जिल्हा रुग्णालय व जिल्हा कारागृह प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृहात न्यायालयीन बंदींसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चोंधे बोलत होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर बक्षी, डॉ. चंद्रकांत काटकर, डॉ. युवराज करपे आदी उपस्थित होते. कारागृहात विविध आजारांनी त्रस्त असलेल्या न्यायालयीन बंदीच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी शिबीराचे आयोजन केल्याचे सांगून चोंधे म्हणाले, जिल्हा रुग्णालय न्यायालयीन बंद्यांच्या आरोग्य तपासणीसाठी वेळोवेळी मदत करतात. या कारागृहात 159 पुरुष व 9 स्त्री न्यायालयीन बंदी ठेवण्याची क्षमता आहे. अशा आरोग्य शिबीरामुळे कारागृह प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. डॉ. सुधीर बक्षी म्हणाले, न्यायालयीन बंदींना वेळोवेळी औषधोपचारांची गरज असते. अशा आरोग्य शिबीराच्या माध्यमातून  जिल्हा कारागृहातील बंदीवाणांच्या आरोग्याची काळजी प्रशासन घेत आहे. शिबीरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला.