Breaking News

अखिल भारतीय प्रजापती महासंघाच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी कैलास राऊत

 बुलडाणा (प्रतिनिधी) । 22 -  दिनांक 13 व 14 फेब्रुवारी 2016 ला तमिलनाडूची राजधानी चेन्नई येथील वंडलूर येथे अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघाच्या वतीने कुंभार समाजाचे विश्‍वसंम्मेलन आयोजित करण्यात आले  होते.
 या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तमिलनाडू राज्याच्या मुख्यमंत्री जयललीता व मंत्री मंडळातील मंत्रीगण तसेच महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज प्रजापती, जनरल सेक्रेटरी गोवर्धन चव्हाण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक सोनवणे, भारतातील सर्व राज्यातील प्रेदशाध्यक्ष, नेपाळ, भुटान, बांग्लादेश, कुवेत येथील समाज बांधव यांच्या उपस्थितीत मेहकर तालुक्यातील दे. माळी येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास राऊत यांची निवड करण्यात आली. तामिलनाडू राज्याचे कुंभार समाजाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सेमानारायणस्वामी प्रजापती यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, नियुक्तीपत्रक, शाल व श्रीफळ देवून सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी कुंभार समाजाचे नेते देवराव कापडे अकोला, बुलडाणा जिल्हाध्यक्ष गजानन दसरकर, माजी जिल्हाध्यक्ष गणेश सोनूने, मांडवकर व महाराष्ट्रातील शेकडोसमाजबांधव, तमिलनाडू राज्यातील लाखो 
समाज बांधव उपस्थित होते. त्यांच्या या निवडी बद्दल संपुर्ण महाराष्ट्रातून कुंभार समाज बांधव, पत्रकार हितचिंतक यांनी अभिनंदन केले आहे.