Breaking News

हेल्मेट सक्तीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पाठींबा

नाशिक/प्रतिनिधी। 13 -  हेल्मेट सक्तीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पाठींबा दर्शविली आहे. अशी माहिती नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिली आहे. दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट हि काळाची गरज असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात  दुचाकी धारकांना हेल्मेट व चारचाकी धारकांना सीटबेल्टची सक्ती करण्यात आली आहे. पुणे सारख्या शहरात याला विरोध होत आहे. लोक रस्त्यावर उतरून आंदोलन व मोर्चे काढत आहे. 
हेल्मेट हि काळाची गरज असून हेल्मेट हि सक्ती न समजत ते आपल्या भल्यासाठीच आहे असे समजावे असे खैरे म्हणाले. यापूर्वी नाशिक शहरात हेल्मेट न वापरणार्‍यांवर पोलीसाकडून  दंडात्मक कार्यवाही करण्यात येत होती. पण दंडात्मक कार्यवाही करण्यापेक्षा जनतेत हेल्मेटचे महत्व सांगणे महत्त्वाचे होते म्हणून  जनजागृतीवर भर देण्यासाठी यापूर्वी नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अंबादास खैरे 
यांनी हेल्मेट वाटप करून कार्यकर्त्यासोबत नाशिक मधील विविध ठिकाणी हेल्मेट जनजागृती केली होती. नाशिक मधील चौकात व सिग्नलवर उभे राहून हेल्मेट जनजागृतीचे फलक दाखवून हॅणडबिलचे वाटप केले गेले होते. जनतेला याचे महत्व पटावे यासाठी रस्त्यावर उतरून जनजागृती करण्यात आली  होती. खैरे यांच्या मतानुसार  वाहनधारकांनी हेल्मेट हि सक्ती न समजता आपला व आपल्या परिवाराचा विचार करून हेल्मेट वापरणे आपली गरज आहे असे समजावे. तसेच पोलीस कर्मचार्यांनी दंडात्मक कार्यवाही करण्यापेक्षा जनजागृतीवर भर देणे आवश्यक आहे. जर यापुढे नाशिक शहरात हेल्मेट वापरण्याबाबत  जनजागृती करण्याची गरज भासलीच तर  राष्ट्रवादी युवक काँग्रेस मागे पुढे न पाहता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून जनजागृती करेल.