Breaking News

खासदारांच्या घरावर कामगारांचा मोर्चा

 अहमदनगर । प्रतिनिधी । 17 -   विडी बंडलावर 85 टक्के धोका चित्र छापण्याची अट रद्द करावी, या मागणीसाठी विडी मालक संघाच्या वतीने सोमवारी खासदार दिलीप गांधी यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला.
विडीच्या बंडलवर 85 टक्के चित्र छापण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. ही अट रद्द करावी, यासाठी विडी उद्योग समूहाचे मालक प्रतिनिधी कामगार संघटना, लाल बावटा, इंटक आदी संघटनांनी पुढाकार घेतला आहे. जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा निघाला. तेथून हा मोर्चा कोठी रस्त्यावरील गांधी यांच्या निवासस्थानावर जावून धडकला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चा तेथून गांधी यांच्या कार्यालयाकडे गेल्यानंतर तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. खा. गांधी घरी नव्हते. त्यांच्या पत्नी सरोज गांधी यांनी निवेदन स्वीकारले. आंदोलनात कॉ. शंकर न्यालपल्ली, कॉ. कारभारी उगले, शंकरराव मंगलारप, अँड. सुधीर टोकेकर, बापू कानवडे, बुचव्वा श्रीमल, कमलाबाई दोंता, कविता मच्चा आदींचा समावेश होता.