Breaking News

मुंबईतील एक लाख रिक्षाचालक संपावर

मुंबई, 15 - सामान्य मुंबईकरांसाठी आजचा दिवस डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील तब्बल एक लाख रिक्षाचालकांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. 
विविध मागण्यांसाठी रिक्षाचालकांनी हा संप पुकारला आहे. ओला, उबेर यासारख्या खासगी वाहतुकीमुळे रिक्षाचालकांच्या व्यवयासावर परिणाम झाल्याचा आरोप रिक्षाचालकांनी केला आहे. तसेच परवाना मिळवण्यासाठी सरकारने नियम कठोर केल्याने अडचणी वाढल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान, या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी रिक्षाचालकांवर बळजबरी केली जात असल्याचे पाहायला मिळते आहे. नवीन रिक्षांच्या परवान्यांचे वितरण, उबेर, ओला यांच्या सारख्या खासगी टॅक्सी कंपन्यांवर कारवाई आणि अवैध प्रवासी वाहतुकीला आळा अशा मागण्यांसाठी रिक्षावाल्यांनी हा संप पुकारला. दरम्यान, नेहमीप्रमाणे बेस्ट मुंबईकरांसाठी धावून आली. या संपाच्या कालावधीत बेस्टने मुंबईकरांसाठी जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.