Breaking News

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव

 बुलडाणा (प्रतिनिधी) । 22 - स्थानिक पंकज लध्दड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन दि.11 ते 20 फेब्रुवारी या कालावधित संपन्न झाले.  यावेळी 11, 12 , 13 फेब्रुवारीला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट, खो-खो, कबड्डी अशा विविध मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच दि. 15, 16, 17 व 18 या कालावधीत मीस म्याँच डे, ट्रॅडिशनल डे आदि असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
स्नेहसंमेलनाच्या मुख्य दिवशी म्हणजेच 19 व 20 फेब्रुवारीला विविध सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न झाले. दि. 19 फेब्रुवारीला शुक्रवारी डिझायर-2016 च्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ.दिपक लध्दड, प्रमुख अतिथी म्हणून मत्सोदरी अभियांत्रीकी विद्यालय जालना, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चेतनकुमार सेदानी, प्रा.रेड्डी, संस्थेच्या सचिव सौ.डॉ.संगीता लध्दड, सहसचिव, रविंद्र लध्दड, कोषाध्यक्षा सौ.अर्चना लध्दड, महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ.प्रदिप जावंधिया, स्नेहसंमेलनाचे समन्वयक, प्रा.गणेश देशमुख, स्नेहसंमेलन सचिव कु.वृषाली जाधव, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ.चेतनकुमार सेदानी यांनी तांत्रिक शिक्षण घेणारे विद्यार्थी हे चांगले आयोजक असतात. असे प्रतपादन केले. भाजपाच्या युगाची गरज लक्षात घेवून त्याप्रमाणे उपकरण निर्मीती करावी असे आवाहन केले तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ.दिपक लध्दड यांनी विद्यार्थ्यांना डिझायर -2016 चा मनसोक्त आनंद लुटावा असे प्रतिपादन केले.  यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका, गायन अशा विविध कलागुणांद्वारा उपस्थितांचे मनोरंजन केले. तसेच आज दि. 20 फेब्रुवारी रोजी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस व पशस्तीपत्राचं वितरण करण्यता आले. तसेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापिठामध्ये 7 वी मेरीट आलेली महाविद्यालयाची विद्यार्थीनी नेहा वाघमारे हिला प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी बोलतांना प्राजक्ता माळी यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे दिली. तसेच त्यांनी आपल्या कौटूंबीक परिस्थितीवर प्रकश टाकला व आपल्या सिने जीवनाची सुरुवात कशी झाली याबद्दल उपस्थितांना सांगीतले. प्राजक्ता माळी स्वतः मध्यमवर्गीय कुटूंबातीलच आहेत.त्यांनी हे यश कसे गाठले याबद्दल सांगितले. तसेच कोणिही अभिनेता किंवा अभिनेत्री बनू शकते त्यामुळे प्रयत्न करा व आशावादी बना असा मोलाचा सल्ला दिला.
स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रदीप जावंधिय यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलन समन्वयक गणेश देशमुख, सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.