Breaking News

‘गोटफार्मचे’ ना तुपकरांच्या हस्ते उद्घाटन

 बुलडाणा (प्रतिनिधी) । 22 - मौजे ढालसावंगी येथील प्रगतशिल शेतकरी लडके यांनी पारंपारीक शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीला पुरक असा जोडधंदा म्हणून अद्यावत ‘गोटफार्म’ सुरू केला आहे. या गोटफार्मचे उद्घाटन शेतकरी नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकरयांच्या हस्ते दि.15 फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
यावेळी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतांना ना.तुपकर म्हणाले की सद्या बुलडाणा जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट आहे. सततची नापिकी, अतिवूष्टी, गारपिट यामुळे शेतकरी हवालदिल झाला असुन आर्थिक संकटात सापडला आहे. काही शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहेत. अपुरा पाऊस व सिंचनाची सोय नसल्याने शेती व्यवसाय परतडत नाही परंतु जिल्ह्यामध्ये मोठे उद्योग नसल्यामुळे तरूणांना व शेतकर्‍यांना रोजगार नाही. त्यामुळे पर्याय नसल्याने नाईलाजास्तव पारंपारीक शेती करणो भाग पडते एकंदरीत सर्वच बाजुन शेतकरी संकटात सापडला आहे. परंतु अशा परिस्थितीत सुध्दा न  डगमगता  लडके यांनी आधुनिक तुत्राचा वापर करून शेतीला पुरक असा अद्यावत गोटफार्म सूरू केला आहे. हि निश्‍चीतच  कौतुकास्पद बाब आहे. 
विदर्भातील शेतकर्‍यांनी पश्‍चिम महाराष्ट्रातिल शेतकर्‍यांप्रमाणे शेतीला पुरक जोड धंदा म्हणुन दुग्ध उत्पादन, शेळी पालन तसेच प्रक्रिया उद्योग याकडे वळण्याची खर्‍या अर्थाने आज गरज आहे. शेळी पालण हा कमी गुंतवणुक आणि सहज करता येणारा सोपा यावसाय आहे. तसेच बाजारात शेळीला चांगली मागणी असुन त्यापासुन कमी दिवसात चांगले उत्पन्न मिळते तसेच शासन सुध्दा दुधाळ  जनावरे व शेळी पालन व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍यांच्या  पाठीशी उभे आहेत. दुधाळ जनावरे व शेळी पालणास चालना देण्यासाठी शासन लाभार्थ्यांना  अनुदान देते याचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.  यावेळी ना.रविकांत तुपकर यांयासह ढालसावंगी येथील शेतकरी व परिसरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.