Breaking News

भारत जगाला वैज्ञानीक पुरविणारा देश होणारः आ. बोंद्रे

 बुलडाणा (प्रतिनिधी) । 22 - पंचायत समिती चिखली अंतर्गत उंद्री येथील अपूर्व बालवैज्ञानीकांचा मेळावा हा आजपर्यंतच्या मेळाव्यापेक्षा एक आगळावेगळा तसेच सर्वांच्या स्मरणात राहील असा मेळावा आहे. असे उद्गार आयोजित मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी आमदार राहुल बोद्रे यांनी काढले. 
उंद्री येथे आयोजित मेळाव्यास मार्गदर्शन करतांना आमदार राहुल बोंद्रे यांनी आपल्या आगळया वेगळया शैलीत मुलांमध्ये वैज्ञानीक दृष्टीकोन रूजवावा या दृष्टीने, पाश्‍चात्य, भारतीय वैज्ञानीकांचा गुणगौरव गोष्टीरूपाने सांगितला. सर्व विद्यार्थी एकाग्रतेने एैकत व आमदार महोदयानी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तरे देत. सदर प्रसंगीचे वातावरण भावनाविवश बनले होते, सर्वच विद्यार्थांनी मोठया आत्मविश्‍वासाने आ.राहुल यांना एकाग्रतेची साथ दिली. त्याचाच प्रतिसाद म्हणून आ.राहुल बोंद्रे यांनी विद्यार्थांमध्ये विज्ञाना विषयी आवढ निर्माण व्हावी, या उदात्य हेतूने पुढील शैक्षणीक वर्षापासून आयोजित तालुका स्तरीय विज्ञान मेळाव्यात सर्वोत्कृष्ट ठरणार्‍या उपक्रमास उत्तेजनार्थ 11,111/-रूपयाचे बक्षिस देणार असल्याचे जाहीर केले. या प्रित्यार्थ 
जि.प./प.स.च्या वतीने आमदार राहुल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.  सदर मेळाव्यामध्ये सदर मेळाव्यामध्ये मान्यवरांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या स्वागत कमानींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 
मान्यवरांचे ढोल ताशांच्या व टाळयांच्या गजरात स्वागत करण्यात आले. सदर मेळाव्यात पंचायत समिती मधील 75 उच्च प्राथमीक शाळांनी व 50 माध्यमीक शाळांनी सहभाग घेतला. एकुण 15 खोल्यांमध्ये नाविण्यपुर्ण अशा साहित्यांची मांडणी करण्यात आली. सदर साहित्यांची मान्यवरांनी सुध्दा पाहणी करून सहभागी शाळांचे व विद्यार्थांचे अभिनंदन केले.  सदर मेळाव्यास गटविकास अधिकारी डॉ. रामावत, जि.प.सदस्य अशोकराव पडघान, युवक कॉगे्रस महासचिव राम डहाके, प.स.सदस्य लक्ष्मण आंभोरे, यांनी सुध्दा विध्यार्थांना मार्गदर्शन करून सहभागी शाळांचे अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षा पं.स.सभापती सौ. सत्यभामाताई डहाके यांनी सुध्दा विद्यार्थांना शुभेच्छा देवून सहभागी शाळांचे कौतूक केले. यावेळी उपसभापती सौ. कोकीळाताई परीहार, समाधान सुपेकर, दयानंद खरात, प्रसाद देशमुख, विमलताई लहाने, सरपंच, ग्रा.प.सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, अतुल मोहता, छगन मोहता सर, प्राचार्य 
सचिन राजपुत, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्तावीक विस्तार अधिकारी जे.डी. काळे सुत्रसंचलन शैलेश काकडे, यांनी तर आभार प्रदर्शन राउत यांनी मानले. सदर मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी उंद्री केंद्रामधील केंद्र प्रमुख, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.